मोगरा फुलाचे मनोगत निबंध | मोगरा फुलाचे आत्मकथन

मी मोगरा बोलत आहे आज मी तुमच्या भेटीला आलो आहे, फुलांमध्ये माझी एक छोटी अशी मोगरा नावाने ओळख आहे, माझा रंग पांढरा आहे, आम्ही  तिघेजण भावंडे आहोत त्यामध्ये सहा पाकळ्या चा मोगरा आणि अनेक पाकळ्यांचा मोगरा त्याला तुम्ही बट मोगरा म्हणून देखील ओळखता आणि तिसरा म्हणजे  हजारी मोगरा असे आहोत.

 माझ्या मोहक सुगंधासाठी मि प्रसिद्ध आहे माझ्या दिसणाऱ्या त्या माझ्या पांढऱ्या पाकळ्या आणि सुगंधाने तुमच्या हृदयात मी जागा निर्माण केली आहे मला खूप चांगल वाटतं जेव्हा मला काही संस्कृतीमध्ये चांगले स्थान देतात मला औषधासाठी आणि अत्तर बनवण्यासाठी वापर करतात आणि  जेव्हा माझ्या मध्ये असलेला सुगंधी हा गुणधर्मामुळे तुमचं मन प्रसन्न करतो.

माझे जन्मस्थान ( मोगरा )

तुम्हाला माहित आहे का हे माझं जन्मस्थान मुख्यत्वे भारत फिलिपाईन्स नेपाळमध्ये आहे, आणि माझ्या फुलांचा आकार 2.5 cm चा आहे मी बहुतेक वेळा तुम्हाला उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात दिसून येतो. माझी उंची इतर झाडांपेक्षा खूपच कमी आहे फक्त तीन मीटर आहे, आणि माझ्या आयुष्य सुद्धा  दहा ते बारा वर्षे आहे, पण मला खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही प्रेमळ मनाने आणि सुगंध घेण्यासाठी आपल्या हाताने तोडून माझ्या फुलांचा गजरा करून स्त्रिया केसात वापरतात आणि आपले सौंदर्य वाढवतात. 

तुम्हाला माहित आहे का संपूर्ण इतिहासात, भारतीय संस्कृतीत माझा खुप आदर केला आहे.  लग्नसोहळ्यांपासून ते धार्मिक समारंभांपर्यंत, माझ्या फुलांनी नवीन नवरीच्या केसांनी सौंदर्य वाढवले आणि मंदिरांच्या सजावटीसाठी माझा खूप आदरणीय उपयोग केला आहे. भारतीय परंपरांच्या जडणघडणीत, प्रेम आणि अध्यात्माचे आम्ही प्रतीक आहोत.

 जसजशी वर्षे सरत गेली तसतसा माझा सुगंध दूरवर पसरत गेला, जी लोक माझ्या संपर्कात आली  त्या सर्वांना मी मोहित केले.  मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांपासून ते काश्मीरच्या शांत बागांपर्यंत, माझा सुगंध माझ्या जन्मभूमीच्या सौंदर्याची आणि विविधतेची सतत आठवण करून देतो.

आव्हान

 तरीही, सर्व सजीवांप्रमाणेच, मी माझ्या वाट्याला आलेल्या आव्हानांचा सामना केला आहे.  प्रदूषण, जंगलतोड आणि हवामान बदलामुळे केवळ माझ्या अस्तित्वालाच नाही तर निसर्गाच्या नाजूक समतोलालाही धोका निर्माण झाला आहे.  या सर्व गोष्टी होऊन सुद्धा आम्ही पृथ्वीवर ताट मनाने राहतो, बदलत्या काळाशी जुळवून घेत असतो आणि जिथे जातो तिथे आनंद पसरवत असतो.

 मी अनेक दिवस जगू शकतो. पण हळूहळू माझ्या पाकळ्या कोमेजून आणि माझ्या पाकळ्यांचा रंग बदलू लागतात या नंतर शेवटी, मी झाडावरून कोमजून खाली पडते.

पण मला त्याचे वाईट वाटत नाही. मला माहित आहे की मी माझ्या जीवनात खूप काही केले आहे. मी लोकांना आनंद दिला आहे आणि निसर्गाचे सौंदर्य वाढवले आहे. मला माहित आहे की मी जरी  कोमजुन गेलो तरीही, माझा सुगंध आणि सौंदर्य लोकांच्या मनात सदैव रमून राहील आणि मी इथे माझा मी निरोप घेतो.

Leave a Comment