गटारी निमित्त तुम्ही तुमच्या ज्या मांसाहार प्रेमी मित्रांना भेटू शकत नाही अशांना सोशल मिडीयाच्या (Social Media) माध्यमातून नक्कीचं शुभेच्छा देवू शकता. गटारी निमित्त काही खास डिजिटल (Digital) शुभेच्छा आम्ही तुमच्यासाठी घेवून आलो आहे. त्या तुम्ही तुमच्या मांसाहर प्रेमी मित्रांबरोबर या मजेशीर शुभेच्छा नक्कीचं शेअर करु शकता.
महाराष्ट्रातील मराठी दिनदर्शिकेनुसार गटारी अमावस्या आषाढ महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. श्रावण महिन्यात पुढील 40 दिवस मद्यपान आणि मांसाहार (Non-Veg) वर्ज्य केला जातो. अशा परिस्थितीत, पारंपारिक मराठी महिन्यात, अमावस्या हा शेवटचा दिवस असतो ज्या दिवशी बहुतेक लोक मांसाहारी जेवण करतात, आणि मद्याचे सेवन करतात. यावेळी गटारी अमावस्या २८ जुलै २०२२ ला साजरी होणार आहे. गटारी अमावस्येनंतर महाराष्ट्रात श्रावण महिन्याची सुरुवात होते.
महाराष्ट्रात श्रावण उत्तर भारतानंतर १५ दिवसांनी सुरू होते. महाराष्ट्रात 29 जुलै 2022 पासून भगवान शिवाच्या उपासनेचा श्रावण महिना सुरू होणार आहे. भक्त पवित्र श्रावणाच्या विधी आणि प्रथा पाळतात. श्रावणात मांसाहार आणि मद्याचा त्याग करून ते सात्विक भोजन करतात. तर उत्तर भारतात ती हरियाली अमावस्या म्हणून ओळखली जाते.
गटारी अमावस्येनंतर श्रावण सुरू होतो. त्यानंतर लोक मांसाहार, मादक पेये आणि कांदे आणि लसूण यांसारखे तामसिक पदार्थ खाणे वर्ज्य करतात. त्यामुळे श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच लोक मांसाहार करून श्रावणातील सर्व प्रथा पाळण्याची तयारी करतात. हा दिवस महाराष्ट्रात गटारी म्हणून साजरा केला जातो जो श्रावणापूर्वी येणाऱ्या अमावास्येला असतो. यंदाच्या वर्षी अमावस्येची तिथी कृष्ण पक्ष अमावस्या 27 जुलै रात्री 09:12 वाजता सुरू होईल, तर 28 जुलै रात्री 11.24 पर्यंत कृष्ण पक्ष अमावस्या संपेल.
हिंदू चंद्र कॅलेंडर तीस चंद्र चरणांचा वापर करते, ज्याला हिंदू धर्मात तिथी म्हणतात. श्रावणाच्या स्वागतासाठी मराठी लोक गटारी सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. अमावस्या हा पारंपारिक मराठी महिन्यातील शेवटचा दिवस आहे आणि महिन्यावर चिन्हांकित केलेली चांदणी रात्री गटारी अमावस्या म्हणून ओळखली जाते. गटारीच्या दिवशी, लोक रात्रीच्या जेवणाच्या वेळी त्यांच्या जवळच्या मित्रांसह आणि प्रियजनांसह स्वादिष्ट मांसाहारी अन्न आणि मद्यपेयांचा आनंद घेतात.
गटारी अमावस्या साजरी करण्यामागचे कारण पाहिले तर श्रावण महिन्यात आजारांचा धोका जास्त असतो. कारण हा महिना पावसाळ्यात येतो. त्यामुळे या महिन्यात लोकांना हलके अन्न खाणे आवडते. गटारी सणाच्या दिवशी, कुटुंबे दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मेजवानीचा आनंद घेण्यासाठी आणि मद्यपान करण्यासाठी एकमेकांच्या घरी जातात.
Gatari amavasaya wishes in marathi 2022,status,quotes, Messages,Images
ओकू नका,
माकू नका,
फुकट मिळाली म्हणून,
ढोसू नका..
मिळेल त्या गटारीत लोळू नका…
गटारीच्या शुभेच्छा!
संपली केंव्हाच आषाढीची वारी,
नंतर आहे गणपतीची बारी,
थोडेसच दिवस हातात आहेत,
जोरात साजरी करू या गटारी…
गटारीच्या शुभेच्छा!
कोंबडीचा रस्सा मटणाची साथ,
मच्छीची आमटी नि बिर्याणीचा भात,
बोम्बिलाची कढी भरलेला ताट,
खाऊन घ्या सगळं,
श्रावण महिना यायच्या आत…
गटारीच्या हार्दिक शुभेच्छा!
सुखाची किरणे येऊ द्या तुमच्या घरी,
चिकन मटण बनवा मस्त मच्छि करी,
आम्हाला जेवायला बोलवा कधीतरी तुमच्या घरी,
पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा,
गटारीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
झेपेल तेवढीच प्या आणि जमेल तेवढेच खा…
चिकन, मटण, मच्छी,
सगळा बेत करा खास
दारू कशाला हवी एवढाच बेत बास
गटारी च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आली आली गटारी
बायको डोळे वटारी.
गटारी अमावस्येच्या
खूप खूप शुभेच्छा!
मौसम मस्ताना,
सोबत सर्व मित्र परिवार असताना,
साजरी करा गटारी अमावस्या
लॉकडाऊन असताना
गटारी अमावस्येच्या शुभेच्छा!
दूध प्यायल्याने ताकद येते…?
मग ५ ग्लास दूध प्या अन्
भिंत हलवण्याचा प्रयत्न करा,
नाही हालत ना,
आता ५ ग्लास दारू प्या,
अन् नुसतं भिंतीकडं बघा,
भिंत आपोआप हलेल.
शुभेच्छुक-गटारीमित्रमंडळ.
पाऊले चालती बियर बारची वाट!
जाताना सुसाट येताना तराट😋
अजून आला नाही हा घरात
अरे पडलाय कि काय गटारात !
नोट : गटारी अमावस्या शुभेच्छा मराठी | Gatari amavasaya wishes in marathi 2021,status,quotes, Messages,Images शेअर करून द्या मजेदार गटारी अमावस्या शुभेच्छा.
………. या आजच्या पोस्टमध्ये दिलेले Gatari amavasaya wishes in marathi ,Gatari amavasaya status in marathi,Gatari amavasaya messages in marathi,Gatari amavasaya quotes in marathi,Gatari amavasaya images in marathi, Gatari amavasaya Funny status messages sms in marathi इत्यादी. बद्दल तुमचे मत कंमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया.