3+ सोपे दसरा सण निबंध मराठी | Dasara Essay In Marathi For Students.

दसरा सण निबंध मराठी / Essay on dasara festival in marathi.

Dasara essay in marathi , दसरा निबंध मराठी
Dasara essay in marathi

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या पोस्टमध्ये आपण दसरा या सणाविषयी माहिती तसेच निबंध घेऊन आलो आहोत. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये माझा आवडता सण किंवा भारतीय सणाविषयी निबंध आवश्यक विचारले जातात. त्यामध्ये खूप जास्त चान्सेस असतात की दसऱ्यावर निबंध तुम्हाला लिहायला सांगितला जाऊ शकतो. त्यामुळे दसरा सणा विषयी 4 उत्तम निबंध आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत, जे तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.

दसऱ्यावर उत्तम निबंध कसा लिहायचा? आजची पोस्ट पोस्ट संपूर्ण वाचल्यावर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल, जेणेकरून तुम्ही या निबंधामध्ये पैकीच्या पैकी मार्क पाडण्यात यशस्वी व्हाल. हे निबंध इयत्ता 1 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील. आपणयामध्ये प्रस्तावना, उत्सवाची वेळ, साजरी करण्याचे कारण, दसऱ्याचे वर्णन, दसऱ्याला विजयादशमी का म्हणतात?, व दसरा सण कसा साजरा करतात या सर्व माहितीचा समावेश केलेला आहे.

Essay No 1

दसरा दहा ओळीत निबंध छोटा / Dasara essay in marathi 10 lines. 

1. भारतात वेळोवेळी अनेक सण साजरे केले जातात.
2. दसरा हा देखील भारतातील प्रमुख सणांपैकी एक आहे.
3. हा सण अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमीला असतो आणि मोठया उत्साहात साजरा केला जातो.
4. दसरा सणाला “विजयादशमी” असेही म्हणतात.
5. दसरा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून आपण साजरा करतो.
6. दिवाळीच्या वीस दिवस आधी हा उत्सव साजरा केला जातो.
7. या दिवशी भगवान रामाने लंकेचा राजा रावणाचा वध केला होता.
8. दसऱ्यापूर्वी देशभरात रामलीला आयोजित केली जाते.
9. दसऱ्याच्या दिवशी मोकळ्या मैदानात रावण, त्याचा पुत्र मेघनाद आणि भाऊ कुंभकरण यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते.
10. हा सण आपल्याला शिकवतो की सत्य, धर्म आणि न्यायाचा नेहमी विजय होत असतो.

Essay No 2

दसरा सण निबंध मराठीत / dussehra nibandh in marathi 200 words.

“सत्याची स्थापना करून वाईटाला
या देशातून नष्ट करावे लागेल.
सत्याची स्थापना करून वाईटाला
या देशातून नष्ट करावे लागेल.
दहशतवादी रावणाचे दहन करण्यासाठी
आज पुन्हा भगवान रामाना यावे लागेल.”

दसरा हा प्रमुख हिंदू सणांपैकी एक आहे, जो ३.५ शुभ मुहूर्तांपैकी एक आहे आणि दिवाळीपूर्वी मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दसरा सणाचे जल्लोषात स्वागत केले जाते. या दिवशी नवीन खरेदी, नवीन करार, नवीन गाडी, बंगले इत्यादी नवीन गोष्टींची खरेदी केली जाते. हा सण दरवर्षी दिवाळीच्या २० दिवस आधी येतो.

नवरात्रोत्सव साजरा केल्यानंतर आश्विन शुद्ध दशमीनंतर विजयादशमी म्हणून हा सण साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची भक्ती भावाने पूजा केली जाते. त्यामुळेच दसरा हा मोठा सण असल्याचे म्हटले जाते. कारण हा तो दिवस आहे ज्या दिवशी देवीने महिषासुराशी युद्ध करून त्याचा वध केला. याच दिवशी भगवान श्रीरामाने असत्य रुपी राक्षस राजा रावणाचा वध केला होता.

दसरा तो दिवस आहे जेव्हा राजपूत आणि मराठ्यांनी त्यांच्या युद्ध मोहिमांना सुरुवात केली होती. या दिवशी शमीच्या पानांची सोन्याच्या रूपात देवाणघेवाण केली जाते. दसऱ्यासाठी घरोघरी गोड पदार्थ तयार केले जातात. दसरा हा सण अज्ञानावर ज्ञानाचा, शत्रूवर शौर्याने आणि कटुतावर प्रेमाने विजय मिळवता येतो हे आपल्याला शिकवतो.

निष्कर्ष

आनंद आणि समाधानासोबतच हा दिवस संपत्तीही घेऊन येतो असे मानले जाते. विजयादशमी हा यश, कीर्ती आणि भाग्य साजरे करण्याचा आणि देण्या-घेण्याद्वारे प्रेम वाढवण्याचा सुंदर दिवस आहे. धन्यवाद.

Essay No 3 

दसरा निबंध मराठी / Dasara Essay In Marathi.(500+ words)

प्रस्तावना

दसरा हा सर्व हिंदूंचा प्रमुख आणि धार्मिक पार्श्वभूमी असलेला पवित्र सण आहे. अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला हा सण साजरा केला जातो. दसरा सणाला पारंपारिक वारसा आहे त्याच बरोबर धार्मिकदृष्ट्या खूप जास्त महत्त्व आहे. भारतीय लोक हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे, म्हणजे पापावर पुण्याचा विजयाचे प्रतीक आहे हेही आपण म्हणू शकतो.

दसरा सण हिंदू धर्मात सलग 10 दिवस साजरा केला जातो, म्हणून याला दसरा म्हणतात. पहिले ९ दिवस दुर्गा देवीची पूजा केली जाते. दहाव्या दिवशी लोक रावण, मेघनाथ, कुंभकर्ण यांच्या पुतळ्यांचे दहन करून उत्सव साजरा करतात.

“केवळ पुतळे जाळावे लागतील असे नाही तर वाईट विचारही जाळावे लागतील, फक्त पुतळे जाळावे लागणार नाहीत तर वाईट विचारही जाळावे लागतील. श्रीरामाचे स्मरण करून प्रत्येक व्यक्तीला रावणाशी लढावे लागेल.”

दसरा साजरी करण्याची वेळ / कधी साजरा करतात.

अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला दसरा हा उत्सव साजरा केला जातो. त्यामुळे दसरा हा सण दरवर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या दोन किंवा तीन आठवडे आधी येतो किंवा साजरा केला जातो.

दसरा साजरा करण्याचे कारण

जेव्हा प्रभू राम 14 वर्षांचा वनवासाला गेले होते तेव्हा प्रभू श्रीराम माता सीता आणि लक्ष्मणजी यांच्यासोबत वनवास घालवत होते, त्यावेळी रावणाने प्रभू श्रीराम नसताना माता सीतेचे अपहरण केले. त्यानंतर श्रीरामांनी सुग्रीव, हनुमान आणि इतर मित्रांच्या मदतीने लंकेवर हल्ला केला आणि रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवला आणि अशा प्रकारे श्रीरामांनी अत्याचारी रावणाला मारून पापावर पुण्य, अधर्मावर धर्म आणि असत्यावर सत्याचा विजय मिळवला. त्या दिवसापासून हा दिवस “विजयादशमी” म्हणून साजरा केला जातो.

पुराणानुसार या दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा वध केला होता. त्यामुळे दसरा सण साजरा केला जातो. माता दुर्गा महिषासुर मर्दानीच्या रूपात येऊन चंदमुंड या राक्षसाचाही वध केला. थोडक्यात, भगवान रामाने या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध केला होता आणि देवी दुर्गाने नऊ रात्र आणि 10 दिवसांच्या युद्धानंतर महिषासुराचा पराभव केला होता. दसरा सण असत्यावर सत्याने मिळवलेला विजय म्हणून आपण सर्वजण साजरे करतो.

दसरा कसा साजरा केला जातो?

दसरा उत्सव प्रत्येक ठिकाणी रामलीलेच्या रूपाने सुमारे 10 दिवस अगोदर सुरू होतो. रामलीलामध्ये प्रभू रामाच्या संपूर्ण जीवनाची झलक अतिशय सुंदर पद्धतीने सर्वांना दाखवण्यात येते. अशा रीतीने पुरुष-महिला, लहान मुले, वृद्ध सर्वजण मोठ्या आवडीने रामलीला पाहतात.

त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी मोठ्या मैदानात जत्रा भरते. जत्रा पाहण्यासाठी लोक अनेक गावांतून लांबून येतात आणि अनेक खरेदी तसेच खाद्यपदार्थाची दुकाने थाटली जातात. लहान मुले खूप आनंदी असतात. दसरा किंवा विजयादशमीच्या दिवशी रावण, मेघनाथ आणि कुंभकर्णाचे उंच पुतळे लाकूड आणि कागदापासून बनवले जातात आणि त्यात फटाके भरलेले असतात.

दसऱ्याच्या संध्याकाळी, म्हणजे त्या दिवशी संध्याकाळ झाली की त्या पुतळ्यांना आग लावली जाते आणि फटाक्यांच्या आवाजाने आणि विदूत रोषणाईने वातावरण प्रकाशमय होऊन जाते, आणि रावणाच्या पुतळ्याचे दहन होते.

दसऱ्याला विजयादशमी का म्हणतात?

लंका विजयाच्या वेळी, भगवान श्रीराम यांनी समुद्रकिनाऱ्यावर 9 दिवस दुर्गा देवीची पूजा केली. दहाव्या दिवशी देवी भगवतीच्या कृपेने श्रीरामाने दुष्ट रावणावर विजय मिळवला,म्हणूनच दसऱ्याला “विजय दशमी” म्हणतात. सांगायचे तात्पर्य असे की प्रभू राम हे युद्धाची देवी दुर्गा देवीचे भक्त होते. युद्धादरम्यान त्यांनी पहिले नऊ दिवस माँ दुर्गेची पूजा केली आणि दहाव्या दिवशी दुष्ट रावणाचा वध केला, म्हणूनच या सणाला “विजयादशमी” असे म्हणतात. कारण तो दिवस भगवान श्रीराम यांच्या राक्षस राजा रावणावर विजयाचे प्रतीक आहे.

दसऱ्याचे महत्व

दसरा सणाचे प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या आयुष्यात खूप महत्त्व आहे. दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे, म्हणून हा सण आपल्याला वाईटावर चांगल्याचा विजय नेहमी होतो हे शिकवतो. हा सण धार्मिक दृष्ट्या अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. असे मानले जाते की दसऱ्याच्या दिवशी सुरू केलेले कार्य निश्चितपणे यशस्वी होते. भगवान श्रीरामाने रावणावर विजय मिळवल्याच्या स्मरणार्थ देशभरात दसरा साजरा केला जातो. दसऱ्याच्या दिवशी जवळपास प्रत्येक शहरात रात्री रामलीलाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. रामलीला आणि रावणाच्या पुतळ्याचे दहन पाहण्यासाठी हजारो लोक एकत्र जमतात आणि आनंदने हा सण साजरा करतात.

भारतीय संस्कृतीत विजयदशमीला खूप शुभ मानले जाते, या दिवशी लोक घरोघरी अवजारांची, शाळकरी मुलांचे पुस्तक, तसेच घरातील सर्व देवी-देवतांची पूजा करतात. शास्त्रानुसार या नऊ दिवसांत शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तिन्ही शक्ती प्राप्त होतात. दसऱ्याच्या दिवशी शाळा आणि कार्यालयांना सुट्टी असते. लोक हा सण खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात.

निष्कर्ष

आपल्या हिंदू समाजात दसऱ्याचा दिवस अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी कामगार आणि मजूर त्यांच्या कामाच्या उपकरणाची आणि मशिनरीची पूजा करतात आणि गोड पदार्थ वाटून आनंद व्यक्त करतात. दसरा हा सण असत्यावर सत्याचा आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे.

दसऱ्याच्या दिवशी भगवान श्रीरामाने राक्षस राजा म्हणजेच वाईटाचे प्रतीक असलेल्या रावणाचा वध केला. त्यामुळे आपणही आपल्या आतमधील वाईट सवयी सोडून चांगल्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत. तरच हा दिवस खऱ्या अर्थाने सार्थ ठरेल. या आशेने तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. 🙏धन्यवाद.🙏

Essay No 4

दसरा विषयी निबंध मराठी माहिती / Dasara nibandh in marathi 250 words.

“दसरा आशा घेऊन येतो.
हा सण आपल्याला वाईटाच्या
अंताची आठवण करून देते;
जे सत्याच्या मार्गावर चालतात त्यांच्यासाठी
दसरा विजयाचे प्रतीक बनतो.”

दसरा हा हिंदू धर्मातील लोकांचा एक महत्त्वाचा व पवित्र सण आहे. जो संपूर्ण भारतात व भारताच्या बाहेरील देशात सुद्धा आनंदाने आणि उत्साहात साजरा केला जातो. दसरा म्हणजेच विजयादशमी हा सण अश्विन महिन्याच्या म्हणजे इंग्रजी दिनदर्शिकानुसार दरवर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात येतो, आणि हा सण अश्विन शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला येतो, जो मोठया धूम-धडाक्यात साजरा केला जातो.

दिवाळीच्या २० दिवस आधी दसरा सण साजरा केला जातो. हा १० दिवसांचा उत्सव आहे, ज्यामध्ये नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. दहाव्या दिवशी देवी दुर्गेने महिषासुर या राक्षसाचा वध केला होता. हा पवित्र सण साजरा करण्याचे आणखी एक कारण म्हणजे भगवान श्रीरामाच्या वनवासाच्या दिवसांत रावणाने कपटाने माता सीतेचे अपहरण केले होते.भगवान श्रीरामाने लक्ष्मण, हनुमान आणि वानर सैन्याच्या मदतीने लंकेवर हल्ला केला आणि रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवला. या दोन कारणांमुळे या दिवशी दसरा सण साजरा केला जातो याला “विजयादशमी” असेही म्हणतात.

भारतातील प्रत्येक शहरात आणि गावात दसऱ्याच्या दिवशी रामलीला आणि जत्रेचे आयोजन केले जाते. त्या दिवशी रात्री राक्षसी रावण, त्याच बरोबर त्याचा भाऊ कुंभकर्ण आणि रावणाचा मुलगा मेघनाद यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते.

हे रावणाच्या पुतळ्याचे दहन पाहण्यासाठी बहुतेक लोक जत्रेत येतात. या दिवशी रात्री फटाकेही भरपूर वाजवले जातात, दसऱ्यामुळे बाजारपेठाही सजलेल्या असतात. लहान मुले तिथून खेळणी, धनुष्यबाण,लाकडी तलवारी इत्यादी खरेदी करतात, तसेच भरपूर खाद्यपदार्थ खाण्याचा अस्वाद घेतात. त्यानंतर भगवान श्रीरामांच्या रूपातील व्यक्ती रावणाला अग्नी बाणाने मारतात. रावणाच्या पुतळ्याचे व इतर दोन पुतळे भरपूर फटाक्याच्या आवाजात जळतात. रावणाचा पुतळा सर्वात मोठा असतो, त्याला 10 डोकी असतात आणि दोन्ही हातात तलवार आणि ढाल असते. हा सण वाईट प्रवृत्तीवर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.

Leave a Comment